Eknath Shinde । मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे गट व शिंदे गट स्थापन झाले आहेत. खरी शिवसेना कोणाची हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात आहेत. मात्र ग्राम पातळीवरील निवणडणुकीत दोन्ही गट आमने – सामने आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील चांगली आघाडी घेतली आहे. यावेळी तर चक्क एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना हि खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख फक्त माजी मुख्यमंत्री असा केला होता. शिवसेना प्रमुख हा उल्लेख करणं त्यांनी टाळलं आहे. तर यानंतर आता राज्यातील काही ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे.
आपल्या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार, असं ते म्हणालेत.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
तसेच शिंदेंनी ट्विट केलेल्या पोस्टर मध्ये निकाल दाखवताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच जनतेचा कौल म्हणत राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी मांडण्यात आली आहे. यातच एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे. यानुसार, या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- 75th Independence Day | भारताच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार ‘ही’ अमेरिकन गायिका
- Sunil Raut । मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात भाजपच्या मोहित कंबोज यांचा समावेश; सुनील राऊतांचा गंभीर आरोप
- Israel Palestine Conflict | इस्रायलचे गाझावर एअरस्ट्राईक तर हमासने इस्रायलवर डागले १०० रॉकेट; मोठ्या प्रमाणात जीवितहानी
- bachchu kadu । ‘मी तर बच्चू’, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याइतका मोठा नाही; मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या बच्चू कडूंची माघार
- Amruta Fadnavis | अमृता फडणवीस म्हणाल्या, गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल, ही पाटी शिंदेंच्या घराबाहेर लावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<