पुणे, मुंबई नंतर आता अॅमिटी युनिव्हर्सिटीचे जाळे औरंगाबादेत

amity-university-eklavya-educators

औरंगाबाद– भारतासह एकूण 9 देशात आपले शैक्षणिक जाळे निर्माण करणाऱ्या अॅमिटी युनिव्हर्सिटीने मध्य भारतातील कॅम्पससाठी औरंगाबादची निवड केली आहे तर यासाठी हनुमान टेकडीमागील जागा देखील निश्चित केली आहे. नवीन कॅम्पससाठी यूजीसी आणि एआयसीटीईची परवानगीही अँमिटीने मिळवली आहे. जर कुठली अडचण न येता सर्व सुरळीत पार पडले तर सहा महिन्यांत इमारत उभारणीला सुरुवात होईल आणि येत्या २०१९-२० पासून ही युनिव्हर्सिटी सुरू होईल. अलिगड मुस्लीम विद्यापीठ आणि आयआयएमसारख्या संस्था हातातून गेल्यावर अॅमिटी विद्यापीठाचा कॅम्पस शहरासह मराठवाड्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

१९८६ मध्ये स्थापन झालेल्या रीतनंद बलवेद शिक्षण संस्थेअंतर्गत अॅमिटी विद्यापीठाची उत्तर प्रदेशातील नोएडा येथे १९९५ मध्ये सुरुवात झाली. यास विद्यापीठ अनुदान आयोग आणि एआयसीटीईची मान्यता आहे. नॅकच्या मानांकनात या विद्यापीठाला दर्जा मिळाला आहे. या विद्यापीठाचे बहुतांशी कॅम्पस उत्तर भारतात आहेत. मध्य आणि दक्षित भारतात विस्तारासाठी विद्यापीठ योग्य शहराच्या शोधात होते. यासाठी २०१२ मध्ये अॅमिटीने विविध शहरांचे सर्वेक्षण केले. त्यात औरंगा

बाद हे भौगोलिकदृष्ट्या योग्य वाटले. येथून मध्य भारतासह दक्षिण भारतातील विद्यार्थीही मिळू शकतील, असा विद्यापीठाचा अंदाज आहे. विद्यापीठाला शहराला लागून पण शांत ठिकाणी जागा हवी होती.

शीतलचंद्र डहाळे यांच्या मालकीची हनुमान टेकडी परिसरात मोठी जागा आहे. २०१३ च्या मध्यात विद्यापीठाची एक टीम या जागेची पाहणी करून गेली. त्यांनी सुरुवातीला एकर जागेवर रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॅम्पस उभारण्यास होकार दर्शवला आहे.

ही विद्यापीठे येणार होती औरंगाबादेत

२०११ मध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा कॅम्पस खुलताबादजवळ निश्चित झाला होता. पण स्थानिक आणि हिंदुत्ववादी विरोधामुळे तो रद्द झाला. २०१४ मध्ये आयआयएमची घोषणा झाली. ती रद्द होऊन स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरचे आश्वासन मिळाले. प्रत्यक्षात एकही संस्था येथे आलेली नाही. सातारा परिसरात भारती विद्यापीठही प्रस्तावित आहे.

देशात 12 वा कॅम्पस असेल औरंगाबाद

अॅमिटी विद्यापीठाचे पुण्या-मुंबईसह देशात ११ तर भारताबाहेर लंडन, सिंगापूर, दुबई, अबुधाबी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, चीन आणि रोमानियात स्वत:चे कॅम्पस आहेत. याशिवाय १६ शहरांत अॅमिटी लॉ स्कूल, प्रीस्कूल आणि इंटरनॅशनल स्कूलही आहेत.अॅमिटीच्या भारतातील कॅम्पसमध्ये सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थी ४५०० शिक्षक आहेत.