आयपीएल स्पर्धा स्थगीत झाल्यानंतर मायदेशी परतताना परदेशी खेळाडुंना करावा लागतोय संघर्ष

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही दिवसापासुन कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा हा यशस्वी पार पडल्यानंतर मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आयपीएलला कोरोनाने गाठले. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करावी लागली.

स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू हे मायदेशी परतण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र भारतातील कोरोनाची परिस्थीती पाहता अनेक देशानी भारतातून येणाऱ्या प्रवाशासाठी नियम कठोर केले आहे. या नियमाचा सामना हा खेळाडूंनाही करावा लागत असल्यामुळे मायदेशी परतत असताना त्यांना संघर्ष करावा लागत आहे. ऑस्ट्रेलियाने तर भारतातुन येणाऱ्या प्रवाशासाठी १५ मे पर्यंत बंदीच आणली आहे. तर इंग्लंडमध्ये खेळाडुंना मायदेशात परतल्यानंतर हॉटेलमध्येच १० दिवस विलगीकरणात राहावे लागत आहे. या दरम्यान त्यांना दोन वेळा कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे.

तर बांग्लादेशमध्ये विमान प्रवास बंद केला आहे. त्यामुळे रोडने गेल्यास १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल. आयपीएल स्पर्धेदरम्यान बायोबबल सारखी कडक उपाययोजना करुनही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. या परिस्थीतीमुळेच बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.

महत्वाच्या बातम्या