राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर अजित पवारांनी केलं धक्कदायक विधान

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राज्यात भाजप शिवसेनेत सत्ता वाटपासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

”सत्तास्थापनेला उशीर होत असल्याने शिवसेना भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच प्रयत्त्नाचा भाग म्हणून राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा  देणार का अशी चर्चा सुरु आहे. मात्र राष्ट्रवादीला जनमतात बसण्याचा कौल दिला आहे. तर ज्यांना जनतेने कौल दिला आहे त्यांनी सरकार स्थापन करावं,” अस धक्कादायक विधान अजित पवार यांनी केलं आहे.

अजित पवार यांच्या या विधानामुळे शिवसेनच्या या दबाव तंत्राला तडा जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता वयात करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्लीत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र गांधी यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याची शक्यता धुडकावून लावी. त्यानंतर आज झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रवादीही शिवसेनेला पाठींबा देणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, काल सोनिया गांधी यांनी तार आज या तातडीच्या बैठकीनंतर पवार यांनी शिवसेनेला पाठींबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. त्यामुळे भाजप शिवसेना युतीतील राजकीय समीकरण कशी जुळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :