महाशिव आघाडीनंतर आता भाजपचीही महत्त्वाची बैठक सुरु

shelar aashish

टीम महाराष्ट्र देशा ; राज्यात राष्ट्रपती राजवट राजवट लागू झाल्यानंतर राज्यातील समस्या वाढत चालल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महाशिवआघाडीची बैठक पार पडली. ज्यात पायाभूत सुविधांपासून शेतकरी समस्या सोडविण्यापर्यंत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

एकीकडे महाशिव आघाडीची बैठक झाली तर दुसरीकडे भाजपनेही आपल्या १०५ आमदारांची बैठक बोलावली आहे. ज्यात राज्यातील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सांगितले. ते म्हणाले, ” भाजपच्या निवडून आलेल्या १०५ आमदारांची बैठक बोलावली जाणार आहे. या बैठकीत विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहचविण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच इतर अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा होईल असे शेलार यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :