लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल-चंद्रशेखर राव

टीम महाराष्ट्र देशा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच विरोधक भाजप आणि नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येऊन तयारी करत आहेत. अश्यातच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपला ‘साथ’ देण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९मधील लोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल, असा शब्द राव यांनी मोदींना दिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. भाजप आणि विरोधकांच्या दृष्टीनं महत्वाची असलेली २०१९ ची आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन ही चर्चा झाली. ‘भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी करणे आमच्यासाठी फायद्याचे नाही; मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं तर, तेलंगण राष्ट्र समिती त्यांना पाठिंबा देईल, हा राव यांनी मोदींना शब्द दिला आहे.

अखेर सत्तेसाठी भाजप व काँग्रेस एकत्र!

You might also like
Comments
Loading...