लॉकडाऊन नंतर आता पुन्हा पोलिसांची बनावट नंबर टाकणाऱ्यांवर नजर

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकुन फिरणाऱ्या सागर सीताराम लिंगायत (वय १९) आणि सीताराम काशीनाथ लिंगायत (वय ४३, दोघेही रा. माणिकनगर, सिल्लोड) पिता-पुत्राविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन नंतर आता पुन्हा पोलिसांची बनवट नंबर टाकणाऱ्यांवर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही कारवाई ११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास वोखार्ड टि पॉईंट येथे करण्यात आली. वाहतुक शाखा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, लॉकडाऊन मध्ये पोलिसांनी नाकाबंदी मध्ये मोठ्याप्रमाणात बनावट नंबर टाकून फिरणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता पुन्हा पोलिसांची नजर अशा प्रकारे दुचाकी अथवा चार चाकीसह इतर वाहनांवर बनावट नंबर टाकणाऱ्यावर असणार आहे.

महत्वाच्या बातम्या :