भारताविरुद्ध लाजिरवाण्या परभावानंतर; ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडला बाहेरचा रस्ता

मॅथ्यू वेड

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम  भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर   जाणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 19 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत टीम पेन कांगारुंचे नेतृत्व करणार आहे. मॅथ्यू वेडला कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे. तर त्या जागी अॅलेक्स कॅरीला संधी देण्यात आली आहे.

कॅरीने बीग बॅश लीगमध्ये मध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने 11 सामन्यात 1 शतकासह 400 धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याला आफ्रिकेविरोधातील कसोटीसाठी संधी देण्यात आली आहे. आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 4 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये सीन एबॉट, माइकल नेसर, मिचेल स्विप्सन आणि मार्क स्टेकिटी यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या