पहिल्या सभेच्या विघ्नानंतर, राज ठाकरेंची तोफ उद्या मुंबईत धडाडणार

raj thackrey

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द झाली आहे. त्यामुळे उद्या राज ठाकरे हे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकीच्या पुढील दोन सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आल्या आहेत. याबाबत मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून माहिती दिली आहे.

पुण्यात राज ठाकरे ज्या सभा स्थळावरून सभेला संबोधित करणार होते ते मौदनात ही चिखल झाला आहे. तसेच आज सायंकाळी सुरु झालेल्या पावसामुळे सभा स्थळाची अवस्था खूपच बिकट झाली. त्यामुळे राज ठाकरे यांची पहिलीचं सभा रद्द झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आज पहिली सभा होणार होती. यावेळी राज ठाकरे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार होते. मात्र अवकाळी पावसाने राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेतचं विघ्न आणले आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात न उतरता भाजप विरोधी भूमिका घेत जोरदार भाषण केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रा ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Loading...

Loading...

Loading...