मुंडे साहेब गेल्यानंतर उसतोड कामगारांच्या कोयत्याला धार कोणाची ?

munde

डॉ रवींद्र खेडकर : मुंडे साहेबांनी आंदोलन हाती घेतला आणि 7 रु 40 पैसे वरून 190 प्रति टन पर्यंत पोहचवला व 190 वरून तोच दर 239 रु प्रति टन वाढवून देणाऱ्या ऊसतोड कामगारांचा स्वाभिमानी नेतृत्व पंकजा गोपीनाथराव मुंडे… संपूर्ण देशभरात बीड जिल्हयाची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून केली जाते, असा कुठलाही साखर कारखाना नाही जिथे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार कामावर नाही. ऊसतोड कामगार आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच जिव्हाळ्याचं नात होत हे सर्व महाराष्ट्र जाणतो.

ऊसतोड कामगारांच आंदोलन मुंडेसाहेबांनी हातात घेतला त्या वेळी ऊसतोड मजुरीचा दर प्रति टन 7.40 पैसे इतका होता पाहिल्याचं आंदोलनात मुंडे साहेबांनी साखर कारखाना मालकांना धारेवर धरले. स्वतः हातात कोयता घेऊन डोक्याला रुमाल बांधून रस्त्यावर वर उतरले. निर्वाणीचा इशारा देऊन पहिल्याच आंदोलनात मजुरी दर दुप्पट 14 रु प्रति टन करायला भाग पाडले आणि गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगारांचे एकमेव तारणहार बनले. त्यानंतर प्रत्येक वेळी झालेल्या आंदोलनात खंबीर पणे लढले, मग ते सत्तेत असोत किंवा विरोधात. मग 24 रु 40रु 74 रु ते थेट 190 रु प्रति टन पर्यंत घेऊन गेले.

त्यातच कारखानदार लॉबीवर राजकारण्यांचा वर्चस्व असल्यामुळे मुंडे साहेबांवर आरोप झाला की मुंडेना “पिठाची गिरणी सुद्धा चालवायचा अनुभव नाही अन निघाले कारखाने बंद करायला”

हे ऐकून मुंडे साहेबांनी वाजपेयी सरकारच्या काळात वैद्यनाथ कारखान्याला परवानगी आणली व विक्रमी वेळेत कारखाना उभा केला. पहिल्याच गाळप हंगामात 2000 मे. टन गाळप क्षमता असताना 3400 टन गाळप करून देशात विक्रम स्थापन केला व देशातील सर्वोत्कृष्ट गाळप क्षमतेचा अवॉर्ड मिळवून दिला.

एव्हढच नव्हे तर ऊसतोड कामगारांना विमा लागू करणारा पहिला कारखाना ठरला. युती सरकारच्या काळात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वस्तीशाळा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व 100% अनुदान उपलब्ध करून दिल.

मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आरोपांची राळ उठवली की सरकारमध्ये असताना संपकर्याच नेतृत्व कसं करणार? त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितल की मी पहिले ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी आहे नंतर सरकारचा मंत्री! उसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रिपद सोडण्यास मी तयार आहे.

असा नेता असणाऱ्या मुंडे साहेबांची केंद्रीय मंत्रीपदावर वर्णी लागली, सर्वात जास्त आनंद ऊसतोड कामगारांना झाला आपला नेता हा देशाच्या उच्च पदावर आहे आता ऊसतोड कामगारांना चांगले दिवस येणार…! आपले सर्व प्रश्न सुटतील या आशेने ते आनंदित झाले. पण नियतीच्या मनात काही वेगळाच होत अचानक मुंडे साहेब आपल्यातून निघून गेले. ऊसतोड कामगार पोरका झाला, त्यांना कोणी वाली राहिला नसल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसली होती.

अशातच संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आख्खा महाराष्ट्र पिंजून काढत, गोरगरीब, कष्टकरी उपेक्षित जनतेला साद घालत, त्यांचा आवाज बनण्यासाठी एकमेव आशेचा किरण बनल्या, लोकनेत्याचा वारसा सांभाळण्यासाठी आपलं डोंगराएव्हढं दुःख विसरून पुढे आल्या त्या पंकजा गोपीनाथराव मुंडे.

ऊसतोड कामगारांना न्याय देण्याची जबाबदारी पंकजाताईंवर आली होतीआणि त्यानी ती सक्षमपणे पेलली. तेंव्हापासून आजपर्यंत ऊसतोड कामागारांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगात तण, मन, धनाने साथ दिली आहे. एव्हढच नव्हे तर लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने कित्येक ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली, हुशार विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग व शेतकी कॉलेज साठी शक्य तेवढया विद्यार्थाना स्कॉलरशिप दिली, अपघात ग्रस्त व आकस्मित मृत्यू ओढवलेल्या मजुरांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली.

2014-15 च्या ऊसतोड कामगारांच्या संपाच नेतृत्व करत मुंडे साहेबांची उणीव कुठेही भासू न देता रस्त्यावर उतरल्या त्या महाराष्ट्राची रणरागिणी पंकजा मुंडे आणि त्याच ताकदीने साखर कारखाना लवाद व सरकार बरोबर वाटाघाटी करून मजुरीत 20% व मुकादम कमिशन मध्ये ही वाढ करून घेतली.

2018 ला ही साखर संघाबरोबर यशस्वी वाटा घाटी करून 5 वर्षाचा करार असतानासुद्धा 5% अंतरिम वाढ करून घेतली. 190 रु प्रति टनावरून लोकनेत्याचा वारसा सक्षमपणे चालवत 239 रु प्रति टन मजुरीचा दर वाढवून घेतला.

कोरोनासारख्या महामारीत तर भयानक संकटात सापडलेल्या ऊसतोड कामगारांच्या मदतीला सर्वप्रथम धावून आल्या त्या फक्त पंकजा गोपीनाथराव मुंडे. ऊसतोड कामगारांच्या व्यथा या नाजूक प्रसंगांमध्ये मुख्यमंत्री यांच्या समोर मांडल्या, ऊसतोड कामगारांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांना सुखरूप घरी जाऊ द्यावे यासाठी राज्यासह केंद्र सारकारकडे ही पाठपुरावा केला व देशातील पहिला स्थलांतरित कामगारांना सुखरूप घरी पोहचविण्याचा निर्णय महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांसाठीच झाला. पहिल लोकडाऊन संपताच ऊसतोड कामगार घरी पोहचले.

या सर्व गोष्टींचा विचार करता उसतोडकामगारांना तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणाऱ सक्षम व विशासार्ह नेतृत्व पंकजाताईं शिवाय आज तरी महाराष्ट्रात नाहीच! ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता असलेलं एकमेव नेतृत्व पंकजा गोपीनाथराव मुंडे हेच आहेत हा विश्वास ऊसतोड कामगारांना आहे यात तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही, तसा असफल प्रयत्न करून कोणी ऊसतोड कामगारांच्या भावनेशी खेळण्याच राजकारण करू नये !

डॉ रवींद्र खेडकर
(ऊसतोड कामगार पुत्र)

महत्वाच्या बातम्या:-