पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, चाहतेही झाले भावुक

virat

अबुधाबी : आयपीएल आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. आयपीएलचा हा महासंग्राम आता रोमांचक वळणावर येऊन पोहचला आहे. ज्या संघाला आयपीएल विजयचा प्रबळ दावेदार मनला जात होता तो संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

सोमवारी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये शारजाह मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात केकेराने आरसीबीवर मात करत विजय मिळवला आणि आरसीबी या पराभवासह आयपीएल मधून बाहेर पडली.

आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना आरसीबीचे फलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीसमोर असहाय दिसला आणि 20 षटकांत 7 गडी बाद 138 धावा केल्या आणि केकेआरला विजयासाठी 139 धावांचे लक्ष्य मिळाले.केकेआरने 19.4 षटकांत 6 विकेटवर 139 धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले आणि सामना चार गडी राखून जिंकला. या विजयासह, केकेआरने पात्रता 2 मध्ये स्थान मिळवले, तर आरसीबीचा प्रवास या पराभवाने संपला.

या पराभवासह आपल्या नेतृत्वात आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचं विराट कोहलीचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर विराट कोहलीला रडू कोसळल्याचं पहायला मिळालं. सामना संपल्यानंतर विराट खूपच भावूक झाल्याचं पहायला मिळालं. मागील काही वर्षांपासून  आरसीबीचं करणधार पद सांभाळल्यानंतर काल त्या कर्णधार पदाचा शेवट झाला. त्यामुळे विराट थोडा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. विराटच्या डोळ्यांत पाणी पाहून त्याचे चाहत्यांनी अश्रू अनावर झाले. या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तसेच कोहलीचा कर्णधार म्हणून शेवट सामना असल्याने चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

महत्त्वाच्या बातम्या