शिर्डी : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रामदास आठवले हे सध्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागात भेट दिली. विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते संगमनेर तालुक्यात आले होते. यावेळीच त्यांनी पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
या पाश्वर्भूमीवर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी रामदास आठवले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता.
“पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडलं होतं. तत्कालीन कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी जबाबदार धरले होते. शिर्डीमधून मला आपल्याच नेत्यांनी पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता रामदास आठवले भाजपासोबत आहेत आणि २००९ साली रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी ज्यांना जबाबदार धरले होते ते राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा आता भाजपामध्ये आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांनी आता मला शिर्डीत मदत कराल ना? असा गमतीने प्रश्न विचारला होता. रामदास आठवले आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात आहेत, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –