पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत भावुक, म्हणाला…

rishbh

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी रात्री शारजाह मैदानावर मोठा विजय नोंदवला. या महत्त्वाच्या सामन्यात अंतिम संघ दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचे जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. सामन्याच्या एका टप्प्यावर दिल्लीचा संघ विजयी होताना दिसत होता पण शेवटी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. हरल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच संघ कुठे कमी पडला हे सांगितलं आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. शारजामधील खेळपट्टी कठीण होती पण आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा दिल्लीचा संघ येथे आला आणि पूर्णपणे कोलमडला. दिल्लीच्या बाजूने कोणत्याही खेळाडूने अर्धशतक केले नाही आणि संपूर्ण संघ 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 135 धावा करू शकला.

उत्तर देण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने नेत्रदीपक पद्धतीने केवळ एक विकेट गमावून 123 धावा केल्या होत्या, पण नंतर अचानक विकेट्स पडल्या 7 रन्समध्ये 6  विकेट पडल्या. मात्र, शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने षटकार ठोकला आणि केकेआरसाठी सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

निराश झालेला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भावनिक दिसत होता, सामन्यानंतर पंत म्हणाला, ‘माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. दिल्लीचा कर्णधार म्हणून मी एवढेच म्हणेन की आम्ही सामना संपेपर्यंत संघर्ष केला. मला वाटते की त्यांनी (केकेआर) पॉवरप्लेनंतर खरोखर चांगली गोलंदाजी केली आणि आम्ही स्ट्राइक व्यवस्थित फिरवू शकला नाही. आम्ही संपूर्ण हंगामात चांगले क्रिकेट खेळलो. बरेच काही शिकणे बाकी आहे. आशा आहे की पुढच्या वर्षी आम्ही परत येऊ आणि चांगले करू.’

महत्वाच्या बातम्या