Share

Sambhaji Bhide । वादग्रस्त वक्तव्यानंतर पहिल्यांदाच संभाजी भिडे आले समोर, प्रसारमाध्यमांनी घेरताच म्हणाले “वाटेत आडवे…”

Sambhaji Bhide । सांगली :  शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. यावरून राजकीय वर्तुळात त्याविषयी चर्चा केल्या जात आहे. या प्रकरणानंतर संभाजी भिडे यांनी सावध पवित्रा घेत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

शिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीला सांगलीत परवानगी नाकारण्यात आली. मात्र तरीही काही मोजक्या कार्यकर्त्यांसोबत संभाजी भिडे दुचाकींवरुन पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी विनंती करुनही ते काही न बोलता निघून गेले. संभाजी भिडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले होते.

दरम्यान, टिपू सुलतानची जयंती कोणत्याही परिस्थितीत साजरी केली जाऊ नये असा इशारा संभाजी भिडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्यासाठी परवानगी देऊ नये. जर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली नाही तर आम्ही जयंती साजरी होऊ देणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठानने दिला आहे.

संभाजी भिडेंचं वक्तव्य काय? (What is statement of Sambhaji Bhide)

बुधवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, ‘तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली?’ यावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही,” असं वक्तव्य भिडे यांनी केलं. यानंतर त्यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. तसेच निषेध करत काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलनही करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sambhaji Bhide । सांगली :  शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now