कॉंग्रेस नेत्याने पक्ष सोडल्यानंतर कार्यालयातील खुर्च्या नेल्या घरी

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस कडून उमेदवारीसाठी वगळण्यात आलेले अब्दुल सत्तार यांनी अखेर कॉंग्रेसला राम राम ठोकला आहे. मात्र अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आपल्या मालकीच्या गांधी भवन मधील खुर्च्या देखील सोबत घेऊन गेले आहेत. या खुर्च्यां अभावी आज होणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला मात्र राष्ट्रवादी भवनात हालवण्यात आलं आहे.

या घटनेवर भाष्य करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, सदर खुर्च्या या मी खरेदी केल्या होत्या. त्यामुळे या खुर्च्या घेऊन जात आहे तसेच माईक सिस्टिमदेखील मी खरेदी केली आहे. ती पण मी घेऊन जाईल असा इशारा देखील सत्तार यांनी दिला आहे.आता पक्ष कार्यालयात केवळ टेबल उरले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या होणाऱ्या बैठकीला आपला मोर्चा राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात हलवला आहे.

दरम्यान औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेस लढवत असून पक्षाकडून सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र या मतदार संघातून कॉंग्रेसकडून लढण्यास अब्दुल सत्तार हे इच्छुक होते. परंतु कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी सत्तार यांचे नाव बाजूला काढत सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता औरंगाबाद मतदार संघात कॉंग्रेससाठी काहीशी अडचण निर्माण झाली आहे.

Loading...