कॉंग्रेसला 400 वरून 44 वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय : मोदी

मुंबई –  400 वरून 44 वर आल्यानंतर यांना ईव्हीएम घोटाळा दिसू लागलाय, कर्नाटक निवडणुकीनंतर तुम्हाला ईव्हीएम घोटाळा आढळला नाही काय, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

काय म्हणाले मोदी

  • संविधान फक्त पुस्तक नाही तर देशाचं भविष्य, आम्ही संविधान दिवस साजरा केला, काँग्रेसला संविधानाविषयी श्रद्धा नाही
  • जनतेच्या नसानसात लोकशाही असल्याचा काँग्रेसला विसर
  • काँग्रेस देशाच्या लोकशाहीचा कधीच विचार करत नाही, कारण पक्षातच लोकशाही नाही, संघ, भाजप आणि मोदींच्या नावाने लोकांना घाबरवलं जातं
  • किशोर कुमार यांच्या गाण्यांवरही बंदी घातली, त्यांची काय चूक होती?
  • कोणे एके काळी काँग्रेसच्या 400 जागा होत्या, आता 48 राहिल्या
  • आणीबाणी आणि महाभियोग ही एकच मानसिकता, काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात