हनुमानाच्या जाती नंतर आता प्रोफेशनच्या चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : संकट मोचक हनुमानाची भाजप नेत्यांकडून जात पडताळणी होत असतानाच , माजी क्रिकेट पटू आणि उत्तर प्रदेश चे मंत्री चेतन चौहान यांनी हनुमानाच्या प्रोफेशनचा देखील उलघडा केला आहे. त्यामुळे हनुमानाच्या जात पडताळणीच्या वादात नवीन भर पडत आहे. माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांनी हनुमान हे खेळाडू असल्याचे एका चर्चासत्रात बोलताना हे मत मांडले.

Loading...

हनुमान कोण होते, याबाबत बोलताना चौहान यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला नाही. मात्र, हनुमान कुस्ती खेळत होते, ते एक खेळाडू होते. जेवढे भी पैलवान आहेत, ते सर्वच हनुमानाची पूजा करतात. त्यामुळे मीही त्यांना तेच मानतो, ते माझ्यासाठी पूजनीय आहेत. देवाची कुठलिही जात-पात नसते, त्यामुळे मी त्यांना कुठल्याही जातीच्या चौकटीत बांधू इच्छित नाही, असे चौहान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी हनुमान हे दलित होते, असा दावा केला होता. तर, भाजपा आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे म्हटले आहे. तसेच योगी कॅबिनेटमधील आणखी एक मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी हनुमान हे जाट समाजाचे होते, असा दावा केला आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...