प्लॅस्टिकबंदीनंतर आता महाराष्ट्रात रासायनिक खतांवर बंदी

ramdas_kadam

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात रासायनिक खतांवर बंदी घालण्याच्या दृष्टीने सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाराष्ट्रात रासायनिक खतांवर बंदी आली तर तो मोठा निर्णय ठरेल असं म्हटलं आहे.रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतांच्या वापराला सरकार प्रोत्साहन देणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी कदम यांनी राज्यात प्लॅस्टिकबंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता पर्यावरणाचा आणि शेतजमिनींचा दिवसेंदिवस होत असलेला ऱ्हास पाहता सरकार हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत, उंबरशेत येथील गौरीच्या तळ्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करताना कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नेमकं काय म्हणाले कदम ?

मला सगळी रासायनिक खतं बंद करायची आहेत. मी मोठा निर्णय घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत मी याबाबत पाऊण तास बोललो. राज्यात 227 नगरपालिका आणि 27 महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. मी जसा प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला, जसा सीआरझेडचा निर्णय घेतला, तसा माझा तिसरा निर्णय असेल, रासायनिक खतं बंद झाली पाहिजेत.