Jitendra Awhad | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील मॉलमधील मारहाण प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्तक नगर पोलिसांकडून आव्हाड यांची चौकशी सुरू आहे. विधियाना मॉलमधील हर हर महादेव चित्रपटाचा शो आव्हाड यांनी बंद पडला होता. आव्हाड यांचे कार्यकर्ते मॉलमध्ये घुसले. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी शंभर जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यावर कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत अटकेआधीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
“आज दुपारी साधारण १ वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो,” अशा आशयाचं ट्विट जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे.
मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 11, 2022
पुढे ते म्हणतात ,“मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे.
“हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही,” अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. या संदर्भात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Snowfall Destination | भारतामध्ये सर्वोत्तम बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Chitra Wagh | “पत्रकार सुपाऱ्या घेऊन प्रश्न विचारतात” ; चित्रा वाघ भडकल्या
- Sushma Andhare | “आपला तो फेकू, दुसऱ्याचा तो पप्पू” ; सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना टोला
- Bachchu Kadu | 12 तारखेला बारा वाजता राज्यभरात जल्लोष करा ; बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांना आवाहन
- Devendra Fadnavis | इंग्लंडमधील तलवार आणि उदयनराजे भोसलेंकडे असलेली तलवार आमच्यासाठी महत्वाची – देवेंद्र फडणवीस