fbpx

वयाच्या चाळीशीनंतर महिला आधीपेक्षा हॉट होतात – विद्या बालन

टीम महाराष्ट्र देशा – वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आधीपेक्षा हॉट होतात, असे मत बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनने व्यक्त केले आहे. एका मॅगझीनला आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीत महिलांविषयी अनेक गोष्टींचा बालनने खुलासा केला.

अभिनेत्री विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वयाच्या चाळीशीनंतर महिलांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण होतो. त्या आधीपेक्षा हॉट होतात. महिला या वयानंतर अधिक काळजी करत नाही आणि जीवन जास्त खास पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत असतात. महिला चाळीशीच्याआधी काही प्रमाणात लाजऱ्या असतात. आपण जेव्हा इतरांचा विचार न करता आपल्या पद्धतीने जीवन जगत असतो तेव्हा आपण जीवनाचा अधिक आनंद घेत असल्याचे विद्या बालनने म्हटले आहे.

यावेळी विद्या बालन म्हणाली की, माझ्या आयुष्यात मी मागे जात आहे. गंभीर होण्याचा प्रयत्न मी करते परंतु मी सगळे काही विसरून जीवनाचा आनंद घेत आहे. जेव्हा मी २० वर्षांची होती तेव्हा माझ्या स्वप्नांविषयी चिंतीत होती, ३०व्या वर्षी मी स्वत:ला ओळखले आणि आता चाळीशीनंतर मी जीवनावर माझ्या जीवनावर प्रेम करायला लागली आहे.