…त्यानंतर पडळकरांवर पुढची कारवाई करणार, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

वाशिम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केल्याप्रकरणी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल. पडळकरांच्या ऑडिओ-व्हिडीओ क्लिपचा तपास समोर आल्यावर पुढची कारवाई करु, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. ते आज (29 जून) वाशिम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

इंधन दरवाढ करत मोदी सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे : बाळासाहेब थोरात

“गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपचा तपास लवकरच समोर येईल. ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्याचदिवशी राज्याच्या पोलीस महासंचालकांना याबद्दल सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल. अहवाल प्राप्त झाला की पुढची कारवाई केली जाईल”, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. याशिवाय पडळकारांविरोधात बीड आणि पुण्यातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशीदेखील माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, दरम्यान, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढला,या गोष्टीवर असणार निर्बंध

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.