fbpx

ठाकरे ,मोदी नंतर आता राहुल गांधी यांचा देखील बायोपिक

टीम महाराष्ट्र देशा : राजकीय नेत्यांच्या बायोपिकचा ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बायोपिक येत असल्याचे समजले होते यामध्ये आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा ही समावेश झाला आहे .

‘माय नेम इज रा गा’ असे राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव आहे . ‘माय नेम इज रा गा’च्या टीझरमध्ये दाखवल्यानुसार, चित्रपटाची सुरुवात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या दृश्यापासून होते व शेवट २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या तापलेल्या वातावरणात होते. मूळचे पत्रकार असलेल्या रूपेश पॉल यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.याबाबत रूपेश पॉल म्हणाले, ‘माझा कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाही. या चित्रपटासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही. कारण, हा चित्रपट वास्तव परिस्थितीवर आधारित आहे. त्यात जे काही दाखवण्यात आले आहे ते जगजाहीर आहे.’

‘माय नेम इज रा गा’मध्ये अश्विनी कुमारने राहुल गांधींची भूमिका साकारली आहे आणि चित्रपटात माजी पंतप्रधानची भूमिका अनुपम खेर भाऊ राजू खेर निभावताना दिसणार आहे. , ‘बऱ्याच लोकांनी ही भूमिका करण्यासाठी नकार दिला होता. मात्र राजू खेर ही भूमिका करण्यासाठी तयार दर्शवली . राहुल गांधींचा यांच्या या बायोपिक ला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.