सचिनला बाद केल्यानंतर आले धमक्यांचे कॉल, गोलंदाजाच्या दाव्याने खळबळ

Sachin Tendulkar

लंडन : कोरोना साथीच्या आजारामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून क्रिकेटला ब्रेक लागला आहे. यावेळी, जगभरातील क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधून जुन्या काळाच्या आठवणी जागृत करत आहेत. अशा परिस्थितीत बर्‍याच क्रिकेटर्सनी काही खळबळजनक दावे केले आहेत. आता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्नन यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

दिलासादायक : हॉटस्पॉट बनलेल्या धारावीत कोरोनामुळे आठडयाभरात एकही मृत्यू नाही

इंग्लंड संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज टिम ब्रेस्ननने दावा केला आहे की, 2011 मध्ये कसोटी सामन्यात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला त्याचे 100 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करू न दिल्याने त्याला आणि ऑस्ट्रेलियन अंपायर रोड टकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

राजभवनाचे ट्विट आले अन सगळ्यांना कळले मिलिंद नार्वेकर आहेत राज्यपालांबरोबर !

२०११ च्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या वेळी सचिनने दमदार खेळी केली. मालिकेतील चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात सचिन ९१ धावांवर खेळत होता. त्या दिवशी जर सचिनचे शतक झाले असते, तर ते त्याचे शंभरावे आंतरराष्ट्रीय शतक ठरले असते.

दरम्यान दुर्दैवाने सचिन ९१ धावांवर पायचीत झाला आणि त्यानंतर त्याला बाद करणाऱ्या गोलंदाजाला आणि बाद ठरवणाऱ्या पंचांना थेट जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असे खुद्द टिम ब्रेस्ननने सांगितले.