श्रुतीनंतर आणखी एक पुण्याची मैना; पाहा पाठकबाईंचा मनमोहक व्हिडीओ

पाठकबाई

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहचली. सध्या या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली असली तरी आजही यातील कलाकरांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकतेच अक्षयाने सोशल मिडीयावर एक नवा रील शेअर केले आहे. सध्या याची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे.

अक्षया ही मूळची पुण्याची आहे. सोशल मीडियावर ती अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत असते. अक्षयाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे.

अक्षयाने ‘मला म्हणत्यात ओ पुण्याची मैना; या ठसकेबाज गाण्यावर रील केला आहे. यामध्ये अक्षया एकदम पारंपरिक अंदाजात दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तर नाकातल्या नथीने तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. यातील अक्षयाच्या अदा पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP