शिवबंधनानंतर शिवसैनिकांच्या हातात वाघाच्या अंगठीचा नवा ट्रेंड

जाणून घ्या टायगर रिंगच्या ट्रेंड बद्दल

टीम महाराष्ट्र देशा- शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या मंगळवारी जयंती आहे, त्यापार्श्वभूमीवर या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. खासदार सावंत यांच्या हस्ते विभागातील सुमारे ८०० शिवसैनिकांना या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं.

शिवसेनेच्या कुलाबा विभागाच्यावतीने ससून बंदर येथे वाघाच्या मुखाची प्रतिकृती असलेल्या खास अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ आणि कृष्णा पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगठ्यांचं वाटप करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

tiger ring arvind sawant

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्ष एकसंध राहावा , पक्षाची पडझड होऊ नये आणि पक्षावर मजबूत पकड रहावी म्हणून २०१४ मध्ये सायनच्या सोमय्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनगटावर शिवबंधन बांधले होते. त्यानंतर शिवबंधन मनगटावर बांधून घेण्याचा मोठा ट्रेंड आला होता. आता तीन वर्षानंतर शिवबंधनपाठोपाठ शिवसैनिकांना वाघाचं चित्र असलेल्या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे.

You might also like
Comments
Loading...