मराठवाड्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस सुरु

औरंगाबाद : मराठवाड्याच्या बहुतांश भागात काल अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाला. या पावसात विभागात चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात दोन महिलांसह एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.

फाटा गावातल्या सोळा वर्षांची मुलगी आणि तिची आई सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना वीज कोसळून त्या जागेवरच ठार झाल्या तर गुंडा इथं एक इसम पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबला असतां, झाडावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला.