स्मिता तांबेचा लेकीसोबत फोटो पाहून जितेंद्रने शेअर केली भावूक पोस्ट

स्मिता तांबे

मुंबई : मराठी-हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सशक्त अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या सामाजिक जाणिवांविषयी सजग आहे. अभिनय क्षेत्रात तिने आपला उत्तम ठसा उमटवला आहे. मात्र सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओतून अभिनेत्री स्मिता तांबे हिच्या घरी नुकतेच चिमुकलीचे आगमन झाले.

नुकतेच स्मिताने इन्स्टाग्रामवर चिमुकल्या वैदिकासोबतचे फोटो शेअर केले होते. हा फोटो पाहून अभिनेता जितेंद्र जोशी भारावून गेला. त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिकासोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं,’ असं जितेंद्रने यावेळी स्मिताचे देखील कौतुक केले आहे.

जितेंद्र जोशीची पोस्ट-

‘प्रिय स्मिता, आजवरच्या तुझ्या आयुष्यात तू जे काही पाहिलंस, काम केलंस, अनुभव घेतलास त्या सर्व गोष्टी करताना तू ठामपणे स्वतःसोबत उभी राहिलीस. तुझ्यासोबत हमिदाबाईची कोठी नाटकात काम करताना मी तुला कधीही सांगू शकलो नाही की तू किती प्रामाणिक आणि मेहनती नटी आहेस. आपली घट्ट मैत्री वगैरे नाही, ना आपण कधी तासनतास गप्पा मारल्या, परंतु तुझं काहीतरी चांगलं होवो आणि तुला तुझ्या आयुष्यात सुख लाभो ही इच्छा माझ्या मनात होती.

पुढे त्याने लिहिले की, तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिकासोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं. तुझ्या पुढच्या वैवाहिक, व्यावसायिक, सामाजिक आयुष्यात तुला भरभरून सुख आणि यश मिळो ही प्रार्थना. सुमित्रा भावेंच्या एका शॉर्टफिल्ममध्ये एक स्त्री गर्भार राहते तेव्हा तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं अशी कल्पना करून एक छोटी कविता लिहिली होती. जितेंद्रच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी प्रतिक्रिया देत कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या