Supriya Sule | मुंबई : वेदांता पाठोमाठ नागपूरमध्ये (Nagpur) होणारा C-295 या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’(Tata Airbus Prroject) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. त्यामुळे आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. यामुळे राज्यात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule)
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. चार ते पाच प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले आहेत. याचं दु:ख नसलं तरी महाराष्ट्रातून हे प्रकल्प का गेले याचा अभ्यास व्हायला हवा. महाराष्ट्र सर्व बाबतीत सरस असूनही हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की, टाटा एअरबस प्रकल्पासह सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पदेखील महाविकास आघाडी सरकारमुळेच राज्याबाहेर गेलेला आहे, असा आरोप शिंदे गट- भाजपाकडून केला जातोय. यावरदेखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दिला जातोय.
मी तर म्हणते सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मी कोणावरही थेट आरोप करत नाही. विद्यमान सरकारमधील मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही होते. तेव्हा ते झोपलेले होते का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना हे लोक सर्व कार्यक्रमात, फोटोंमध्ये दिसत होते. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेले आरोप हास्यास्पद आहेत
महत्वाच्या बातम्या :
- Bachchu Kadu | उद्धव ठाकरेंच्या घरापुढे हनुमान चालीसा म्हणणं चुकीचं होत – बच्चू कडू
- Abdul Sattar | बापाची औलाद असाल तर तुम्ही पण राजीनामा द्या मी पण देतो ; सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान
- Bacchu Kadu | मुख्यमंत्र्यांकडे जाण्यापुर्वी बच्चू कडूंनी केली ‘ही’ मागणी
- Gulabrao Patil | …तर हे सरकार पायउतार व्हायला तयार आहे – गुलाबराव पाटील
- Bacchu Kadu | “मंत्रिमंडळाच्या पहिल्या रांगेत असण्याची अपेक्षा होती, पण…”; बच्चू कडूंनी बोलून दाखवली मनातली खदखद