fbpx

रोहितच्या शतकी खेळीनंतर कोहलीची वाटचाल अर्धशतकाकडे

टीम महाराष्ट्र देशा : विश्वचषकातील रोमांचक आणि लक्षवेधी असणारा भारत वि. पाकिस्तान सामना मँचेस्टरच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरवात केली आहे. भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने आपले विश्वचषकातले दुसरे शतक केले असून १४० धावंवर झेल बाद झाला आहे.

भारताने आता पर्यंत २४८ धावांवर २ विकेट गमवल्या असून क्रीझवर कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्या खेळत आहेत.रोहित शर्मा आणि के एल राहुलने ने पहिल्या डावाला दमदार सुरवात केली आहे. तर या दमदार सुरवातीचा फायदा घेत कर्णधार कोहलीने देखील अर्धशतकाकडे वाटचाल सुरु ठेवली आहे.