fbpx

कॉंग्रेसच्या अडचणी वाढल्या : रॉबर्ट वढेरा यांच्यानंतर ईडीने कार्ती चिदंबरम यांनाही बोलावलं चौकशीला

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वढेरा आज सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते पी.चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना सुद्धा ईडीने चौकशी साठी बोलावलं आहे. INX मिडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम आणि पी.चिदंबरम यांची देखील चौकशी होणार आहे.

दरम्यान,रॉबर्ट वढेरा चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर झाले असून ईडीचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत . वाड्रा यांच्या चौकशीची दुसरी फेरी आज होत आहे आहे. वाड्रा यांचे वकील ईडीच्या कार्यालयात अगोदरच पोहोचले होते.

ईडीने काल देखील वाड्रा यांची चौकशी केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, वाड्रा यांच्याकडे त्यांचया लंडनमधील मालमत्तेबाबत माहिती विचारण्यात आली. शिवाय, संजय भंडारी नावाच्या एका उद्योजकाबाबतही त्यांना विचारणा करण्यात आली. ईडीने वाड्रा यांच्याकडे काही ई-मेलबाबतही माहिती मागितली होती.

 

1 Comment

Click here to post a comment