न्यायालयाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करू – विनोद तावडे

मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाचा शिक्षकांच्या वेतनासंबंधीचा आज निकाल आलेला आहे. या निकालाची अधिकृत प्रत हाती आल्यानंतर पुढील दिशा ठरविली जाईल. पण उच्च न्यायालयाने जर आदेश केले असतील तर त्याप्रमाणे विभाग राष्ट्रीयकृत बँकेकडे नक्की जाईल. फक्त हे मुंबई पुरतेच जायच की राज्यभर जायचे आहे, याचे मार्गदर्शन आम्ही न्यायालयाकडे मागवित आहोत.

आम्ही मधल्या काळात मुंबई बँकेने तिजोरीमध्ये पैसे नसताना गणपती व दिवाळीला पगार उशिरा होणार असतानाही लवकर केले आणि शिक्षकांची सोय केली, याबद्दल मुंबई बँकेचे कौतुक तर होत आहे. ही सोय राष्ट्रीयकृत बँकेकडे होणार नाही. पण शिक्षक संघटनांना तसेच हवे असल्यामुळे आम्ही राष्ट्रीयकृत बँकेत पगार नेण्यास शासन तयार आहे. तरीसुध्दा उच्च न्यायालयाचा निर्णय प्रमाण माणून त्यावर कार्यवाही अर्थातच केली जाईल. निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झाल्यानंतर पुढील धोरण ठरविले जाईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...