रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या विधानसभा निवडणुकीत आमच्या वाट्याला असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपने बंडखोर पेरले. ‘सालेहो’सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसनेच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोर रिंगणात उतरवले असल्याचे आरोप सेनेच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी केले आहे. तर आता याच मुद्यावरून शिवसनेचे नेते आणि राज्याचे नवनिर्वाचित पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजपवर सरळ निशाणा साधला आहे.

Loading...

पाटील पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेत युती असल्याने आम्ही भाजपच्या उमेदवारांसाठी अंग झटकून मेहनत केली. त्यांना निवडणून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला.त्यांचा चहाही प्यायलो नाही. मात्र, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही.भाजपने विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नाही, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...