राज कुंद्राच्या अटकेनंतर कंगनाचा पुन्हा एकदा बॉलीवूडवर निशाणा

कंगना - राज कुंद्रा

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी यावर आपले मत मांडले आहे, यातच आता बॉलीवूड पंगा क्वीन कंगणाने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.

कंगनाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये ती म्हणते की, ‘याच कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते. प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं नसते. मी माझा आगामी प्रोजेक्ट ‘टीकू वेड्स शेरु’च्या माध्यमातून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे’ असे म्हणत पुन्हा एकदा कंगनाने बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

raj kundra porn case, raj kundra case, Raj Kundra, kangana ranaut reacts on raj kundra case, Kangana Ranaut news, Kangana Ranaut,

राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल राज कुंद्रा आणि दुसरा आरोपी रायन जॉन मायकल थार्प या दोघांना न्यायालयात हजर केलं असता त्या दोघांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापैकी राज कुंद्राला सोमवारी रात्री तर थार्पला काल सकाळी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

राज कुंद्रावर यापुर्वीही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये मुंबई येथे राहणारे सचिन जोशी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारावरून ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IMP