औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन-मोदी 

घराणेशाहीवरून कॉंग्रेसवर हल्ला बोल 

टीम महाराष्ट्र देशा – ‘औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.आज राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरुन मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचेही त्यांनी म्हटले.

bagdure

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांच्या विधानाचा संदर्भ देऊन मोदींनी ही टीका केली. ‘शहाजहानच्या जागी जहांगीर आला, त्यावेळी निवडणूक झाली होती का?, शहाजहानच्या जागेवर औरंगजेब आला, त्यावेळी निवडणूक पार पडली होती का? त्यावेळीही निवडणूक झाली नव्हती. कारण सत्तासूत्रे राजाकडून त्याच्या मुलाकडे जाणार, याची सर्वांना कल्पना होती,’ असे अय्यर यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरुन मोदींनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड उठवली.‘औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. मात्र आमच्यासाठी लोकांचे कल्याण महत्त्वाचे आहे. १२५ कोटी जनताच आमची हायकमांड आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर तोफ डागली. ‘काँग्रेस हा पक्ष नसून त्यामध्ये केवळ एका कुटुंबाचाच शब्द अंतिम असतो, हे काँग्रेसच्याच नेत्यांनी मान्य केले आहे’, असेही ते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...