तडीपारीच्या नोटिशीनंतर आता मनसे नेते अविनाश जाधव यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

avinash jadhav

ठाणे: काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे-पालघर जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली. त्यानंतर त्यांना ठाण्यात खंडणीविरोधी विभागाने कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती. कोरोनाच्या काळात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं होताना दिसत होते. तर यानंतर, मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती.

कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टातील हजेरीसाठी जाताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर फुल उधळली, तसेच मनसैनिकांची घोषणाबाजी केली. ठाणे प्रशासनाकडून जाधव यांना तडीपारीची नोटीस काढली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोविडसाठी काम करणाऱ्या नर्ससाठी त्यांनी आंदोलन केले.

दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो, शिवसेनच्या खासदाराचा पलटवार

तर, राजकीय सुढ बुद्धीने हि कारवाई होत असल्याची प्रतिक्रिया, मनसेचे नेते नितीन सरदेसाई व अभिजित पानसे यांनी दिली होती. ‘मौका सभी को मिलता है एकवेळ असेल जेव्हा आमचीही सत्ता असेल, तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरू’, असा इशारा मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी दिला. तसेच, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ही शिवशाही नसून मोघलाईचे सरकार असल्याची टीका एका व्हिडिओद्वारे केली आहे.

चंद्रकांत पाटील पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरला येतात, तर काहींचं आंदोलन अस्तित्वासाठी: सतेज पाटील

यावेळी ते म्हणाले, “अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिलीच, पण त्यांच्यावर ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकल्याने, अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे”.

स्मार्ट सिटीच्या बैठकीत १३ सदस्यांनी तुकाराम मुंढेंना पाडले एकाकी;जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण ?

“सरकार आणि पालकमंत्र्यांना असे गुन्हे दाखल करुन आम्हाला गप्प बसवता येईल असं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असं म्हणालात, पण हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु, जिथे अन्याय दिसेल, तिथे मनसैनिकांची लाथ पडणार” असं देशपांडे म्हणाले.

दरम्यान,कापूर बावडी पोलिस ठाण्यातून कोर्टात नेत असताना अविनाश जाधव बाहेर येताना मनसे कार्यकर्त्यांनी फुले उधळली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. अलीकडेच वसई-विरार महापालिकेत त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काल ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली आहे.