fbpx

अभिनेत्री मुक्ता बर्वेंच्या फेसबुक पोस्टनंतर पुणे महापालिकेला आली जाग

mukta barve fb post Yashwantrao Chavan natyagruh

पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहांमधील अस्वच्छतेचा विषय अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षरश: चव्हाट्यावर आणला. अस्वच्छतेची बाब गांभीर्याने घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या आधीही या सभागृहांमधील अस्वच्छतेबाबत मला स्वत:ला अनुभव आल्याचे टिळक यांनी नमूद केले. हे काम आऊटसोर्सिंगद्वारे असले तरीही जबाबदारी टाळता येणार नाही, किंवा याचा अर्थ अस्वच्छता ठेवणार असाही होत नाही, अशी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना आयुक्तांना दिल्याचे टिळक यांनी नमूद केले.