विमानातील बिघाडानंतर मोदींचा राहुल गांधींना फोन

टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून हुबळी येथे जाताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडाला काँग्रेसनं वेगळं वळण देत कोणीतरी राहुल गांधींविरोधात कट रचल्याचं म्हणत कर्नाटक पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. परंतु या विमानात बिघाड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

विमानाच्या बिघाडामागे घातपाताचाही संशय व्यक्त करत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्या तरी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विमान बिघाडाची राहुल गांधींशी फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. नवी दिल्लीहून कर्नाटकातल्या हुबळी येथे जाणा-या राहुल गांधींचं 10 सीटर दसॉल्ट फॉक्न 2000 एअरक्राफ्ट लँडिंगच्या दरम्यान रनवेवर उतरवण्यात आलं आहे. विमानात राहुल गांधींच्या शेजारील बसलेल्या मुलानं आरोप केला की, विमान अचानक झुकलं जाऊन झटके द्यायला लागलं.