आषाढी वारीचे सर्व धार्मिक सोपस्कर पार पाडीत नाथांची पालखी ‘शिवशाही’ बसने परतली

औरंगाबाद : फुलांनी सजवलेल्या दोन ‘शिवशाही’ बस मधून पांडुरंगाचे दर्शन घेऊन संत एकनाथांची पालखी आज पंढरपुरहुन पैठणकडे परतीच्या प्रवासाला लागली आहे.
आषाढी एकादशीला वारीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा पाच दिवस तेथील सर्व पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी पुर्ण केल्यानंतर भानुदास एकनाथांच्या नामघोषात परतली.

पालखी सोहळ्यातील चाळीस मानकरी व वारकऱ्यांना भक्तीमय वातावरणात निरोप देण्यासाठी सोलापूर जिल्हा व पंढरपूर प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी या प्रसंगी उपस्थीत होते, देशातील कोरोनाचे संकट कायमस्वरुपी टळो व पुढच्या वर्षी नाथांचा पालखी सोहळा परंपरागत पध्दतीने पायी चालत यावा.

अशा शुभेच्छा पंढरपूरकर भाविक भक्तांनी दिल्या, तसेच येणारी वारी उत्साहात साजरी व्हावी अशी अपेक्षा भाविक वारकर्यांनी व्यक्त केली. पालखी परतल्यावर सर्व पारंपारिक पद्धतीने सोपस्कार शहरात पार पाडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या