Share

Andheri by-election । अंधेरी पोटनिवडणुकीत पटेलांच्या माघारीनंतर लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी? ऑडिओ क्लीप व्हायरल

Andheri by-election । मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या. यामध्ये भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील आणि अपक्ष म्हणूनही लढणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला. मुरजी पटेल यांनी माघार घेतल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झालेत.

या निवडणुकीत मुरजी पटेलांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला. पटेलांच्या माघारीनंतर ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी खेळली जात असल्याचा आरोप आहे. या वादाशी निगडित एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ठाकरे गटा विरोधात ‘नोटा’च्या बटणाचा प्लॅन बनवला जात असल्याचा दावा केला जात आहे. या व्हायरल क्लिपमध्ये ‘नोटा’ला मतदान करण्याचं आवाहन केले जात आहे. या ऑडिओ क्लीपमधील आवाज हा मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा केला जात आहे.

अर्ज माघार घेतल्यानंतरही आता हि मोठी बातमी समोर आली आहे. 3 तारखेला ऋतुजा लटकेंच्या विरोधात वेगळीच खेळी आखली जात असल्याचे या कार्यकर्त्याच्या बोलवण्यावरुन समजत आहे. भाजपच्या मुरजी पटेलांच्या माघारीनंतर ‘नोटा’तून रोष व्यक्त केला जात असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काका नाही. कमळाचे चिन्ह नाही पण नोटा चे बटन आहे. ‘नोटा’द्वारे रेकॉर्ड मतदान करण्याचं आवाहन या क्लीपमध्ये करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Andheri by-election । मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now