fbpx

नागपूरनंतर सांस्कृतिक राजधानी पुणे बनतेय क्राइम कॅपिटल

टीम महारष्ट्र देशा : मुख्यंत्र्यांचा बालेकिल्ला आणि उपराजधानी नागपूरनंतर आता सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्याचीही क्राइम कॅपिटल अशी ओळख निर्माण होत चालली आहे. एका महिन्यात पुण्यात तब्बल १२ खून पडलेत. या हत्यांनी पुणे हादरले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा सरकार सत्तेत येऊन ४ वर्षे लोटली तरी राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री मिळालेला नाही. गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले. पण फडणवीस हे गृहखात्याच्या अतिरिक्त जबाबदारीस न्याय देऊ शकलेले नाहीत. त्यामुळेच राज्यात गुन्हेगारीचा आलेख हा चढता राहिला असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

जानेवारीच्या पहिल्या २८ दिवसांत पुण्यात पडलेले १२ खून हे त्याचेच प्रतिबिंब आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. खुनासारख्या या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग, ही चिंताजनक बाब आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल १२०० अल्पवयीन मुले गुन्हे करताना सापडली आहेत.

1 Comment

Click here to post a comment