Share

IPL 2023 | एम एस धोनी नंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग (Channai Super Kings CSK) व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.आयपीएल (IPL) च्या मागच्या हंगामामध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली CSK ला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पर्वाच्या मध्येच संघाने एम एस धोनी (MS Dhoni) कडे कर्णधारपद सोपवले होते. या निर्णयामुळे जडेजा नाराज असल्याची चर्चा क्रिकेट विश्वात चांगल्या रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चा नंतर IPL 2023 चा रिलीज आणि रिटेनमुळे या चर्चा कुठेतरी थांबल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jafar) म्हणाला आहे की, “आयपीएल 2023 हा एम एस धोनीसाठी शेवटचा हंगाम असणार आहे.” त्यामुळे पुढच्या वर्षी चेन्नई सुपर किंगचा पुढचा कर्णधार कोण असेल यावर देखील वसीम जाफरने विधान मांडले आहे.

CSK ला पुढील काही वर्षांसाठी संघाचे कोण चांगले नेतृत्व करू शकतो यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र, रवींद्र जडेजा भविष्यात CSK चा कर्णधार म्हणून खेळू शकतो. असे वसीम जाफर म्हणाला आहे. बोलताना तो पुढे म्हणाला आहे की,”CSK ने जडेजाला रिटेन केले, ही चांगली गोष्ट आहे. पण चेन्नई सुपर किंगला आपले भविष्य आणखी बळकट करायचे असेल तर त्यांना इतर पर्यायांकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत CSK ला लिलावामध्ये केन विलियम्सन आणि मयंक अग्रवाल या दोन खेळाडूंकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एम एस धोनी नंतर चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत चांगले चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, ऋतुराज गायकवाड सुद्धा CSK साठी कर्णधार म्हणून चांगला पर्याय असू शकतो. असे देखील जाफरने म्हटले आहे. त्याचबरोबर तो म्हणाला आहे की. “डेविन कॉनवेला यष्टीरक्षक आणि ॠतुराज गायकवाडला कर्णधार म्हणून निवडले तर ही जोडी CSK ला खूप पुढे घेऊन जाईल आणि संघाचे अनेक प्रश्न सुटतील.”

दरम्यान, वसीम जाफर म्हणाला की, “एम एस धोनी नंतर CSK चे नेतृत्व कोण करणार आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या घडीला ऋतुराज गायकवाड हे नाव आघाडीवर असले तरी केन विलियम्सन, मयंक अग्रवाल आणि रवींद्र जडेजा हे तीन नावे देखील फ्रॅंचाईजीच्या व्यवस्थापनाच्या डोक्यात असतील. रणजी क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडने महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधार पदाचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला जर CSK संघाचा कर्णधार म्हणून निवडला तर तो आणखी विकसित होऊ शकतो.”

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि चेन्नई सुपर किंग (Channai Super Kings CSK) व्यवस्थापनामध्ये मतभेद …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now