मनसेच्या इशाऱ्यानंतर आलं फ्लिपकार्टचं डोकं ठिकान्यावर…

manase

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इशारा दिल्यानंतर त्याला फ्लिपकार्ट कंपनीने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फ्लिपकार्टवर सध्या उपलब्ध असलेल्या भाषांसह इतर भाषांमध्येही अॅप उपलब्ध असेल. भारतात विविध भागात पोहोचण्यासाठी विविध भाषा आणि व्हॉइस सॉल्यूशनचा वापर येईल, अशी माहिती फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन कार्यालयांना भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी हे अॅप मराठीत का नाही, याचा जाब विचारला होता. तसंच सात दिवसांत अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला नाही, तर दिवाळी मनसे स्टाईल होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

यानंतर फ्लिपकार्टकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला. “फ्लिपकार्ट ही पूर्णपणे स्वदेशी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेली कंपनी आहे. ग्राहकांना नवनवीन आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न असतो. ई-कॉमर्स सर्वदूर पोहोचवण्यासाठी या उद्योगात लोकशाहीप्रमाणे काम करण्यास कटिबद्ध आहोत. मातृभाषेच्या वापरामुळे मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होतील, लघु-मध्यम उद्योजक आणि कारागिरांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल,” असं फ्लिपकार्टच्या प्रवक्त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-