नेत्यांना भेटल्यानंतर आरोप मिस्टर इंडियासारखे गायब होतात; पवार-सूद भेटीवर मुनगंटीवारांचा टोला

sudhir mungantiwar

मुंबई : अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्यावरून मुंबई महापालिकेच्या रडारवर असलेला अभिनेता सोनू सूदने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली.

शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीबद्दल सविस्तर माहिती समोर आलेली नसून ही सदिच्छा भेट असल्याचं कळतंय. सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने जूहू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमुळे तो चर्चेत आला आहे. सद्या या प्रकरणी सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेतली असून याप्रकरणी सुनावणी देखील सुरु आहे.

दरम्यान, शरद पवार आणि सोनू सूद यांच्या भेटीवर माजी मंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘ याआधी देखील कोरोना काळात मदत करताना सोनू सुदवर शिवसेनेने आरोप केले होते. तेव्हा सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आरोप हे मिस्टर इंडियासारखे गायब झाले. ही एक नवी पद्धत आपल्या देशात विकसित होत आहे.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, ‘कायद्याचं राज्य आहे. पण कायदे फक्त कागदावर असून चालत नाही. या कायद्यांचा धाक राहिला पाहिजे. आज काल कायद्यापेक्षा नेते हे मोठे झाले आहेत. एखाद्या मोठ्या नेत्याची भेट घेतल्यानंतर कायद्याविरोधात काम केलं तरी नेत्याचं कवचकुंड असल्याने कायदा तुम्हारा कूच नही बिघाड सकता ही भावना निर्माण होत आहे. सोनू सूदने पवार साहेबाना आपली बाजू मांडणापेक्षा कोर्टात आपली बाजू मांडायला पाहिजे,’ असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला आहे.  त्यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या