मराठा आरक्षण कोर्टात टिकलं, मराठा समाजाकडून संपूर्ण राज्यात जल्लोष

maratha reservation 1

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई उच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. न्यायालयाच्या मराठा आरक्षणावरील निकालाने संपूर्ण राज्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला असून, नोकरी आणि शिक्षणिक शेत्रातील आरक्षण वैध आहे, परंतु १२ ते १३ टक्के आरक्षण देता येईल असेही न्यायालयाने म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर राज्य सरकारला १०२ च्या घटना दुरुस्तीनुसार आरक्षण देण्याचा अधिकार आहे. आयोग नुसार मराठा समाज मागास आहे. अपवादात्मक स्थितीत ५० टक्के आरक्षणात बदल शक्य असल्याचेही न्यायालयाने म्हंटले. याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण सुरु राहील परंतु १६ टक्के नाही, असेही न्यायालयाने म्हंटले.

दरम्यान न्यायालयाच्या या निकालावरून मराठा समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण राज्यात मराठा समाजाकडून न्यायालयाच्या या निर्णयाचा जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.