Share

Lunar Eclipse | अनेक वर्षानंतर यावर्षी आहे देव दिवाळी दिवशी चंद्रग्रहणाचा योग

टीम महाराष्ट्र देशा: 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण (Solar Eclipse) पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून खगोलप्रेमींना खंडग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclipse) पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या भौगोलिक घटना असून त्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. यावर्षी अनेक वर्षानंतर संपूर्ण चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजेच देव दिवाळी दिवशी होणार आहे. ही एक आश्चर्यचकित करणारी घटना असून ज्योतिषांच्या मते, हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. देव दिवाळी दिवशी होणारे चंद्रग्रहण यावर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण आहे.

खगोल शास्त्रज्ञांच्या मतानुसार, यापूर्वी 2012 आणि 1994 मध्ये दिवाळीला सूर्यग्रहण दिसले होते. तर, त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच देव दिवाळीला चंद्रग्रहण दिसले होते. त्याच्यानंतर यावर्षी हा योग पुन्हा जुळून आला आहे. यावर्षीच नुकतेच दिवाळीला संपूर्ण सूर्यग्रहण पार पडले असून 8 नोव्हेंबरला म्हणजेच देव दिवाळी दिवशी संपूर्ण चंद्रग्रहण होणार आहे.

18 वर्षानंतर चंद्रग्रहण (Lunar Eclipse) चा असा योग घडणार

तज्ञांच्या मते, यावर्षी अनेक वर्षानंतर देव दिवाळीच्या दिवशी संपूर्ण चंद्रग्रहणाचा योग आला आहे. तर, असा योगायोग आता पुन्हा 18 वर्षांनी म्हणजेच 2040 मध्ये येईल. 2040 मध्ये 4 नोव्हेंबरला दिवाळीला सूर्यग्रहण दिसेल आणि त्याच्या 15 दिवसानंतर म्हणजेच 18 नोव्हेंबरला देव दिवाळीच्या दिवशी संपूर्ण चंद्रग्रहणाचा योग येईल. दरम्यान, या दोन्ही ग्रहणांमध्ये सूर्यग्रहण अर्धवट दिसेल. तर, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीत. मात्र, चंद्रग्रहण भारतात दिसेल.

8 नोव्हेंबरला दिसणार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण

8 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातून खंडग्रास चंद्रग्रहण पाण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान देशातील पूर्वेत्तर भागात सर्वाधिक 98% म्हणजेच 3 तास, तर पश्चिम भारतामध्ये केवळ 15 मिनिटे खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येऊ शकते. 8 नोव्हेंबर रोजी दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथील काही भागात देखील दिसेल.

टीप : वरील माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: 25 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यात बहुतांश ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण (Solar Eclipse) पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now