‘महाजॉब्स’ पोर्टल नंतर आता ऍपही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लाँच!

Mahajobs

मुंबई: ६ जुलै रोजी राज्य सरकार द्वारा अनेक उद्योग क्षेत्रातील नोकऱ्यांचा लाभ महाराष्ट्रातील तरुणांना घेता यावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे पोर्टल लाँच करण्यात आले होते. तर काल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्योग विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या महाजॉब्स ॲपचे लॉचिंग करण्यात आले.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलेचे उद्घाटन उद्धाटन केले होते. या पोर्टलद्वारे अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. तर, औद्योगिक क्षेत्रात अनेक व्यवसायांना कुशल नोकरदारवर्गाची गरज असते, मात्र ही माहिती राज्यातील स्थानिक तरुणांपर्यंत पोहोचत नाही. आजकाल, बऱ्याच क्षेत्रात कंपन्यांना कंत्राट दिले जाते, जे बाहेरील राज्यातून कामगार पुरवत असतात. यामुळेच भूमीपुत्रांची बेरोजगारी देखील वाढते.

आनंदाची बातमी : राज्यात प्रथमच एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

तर, आता ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी, तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार महाजॉब्ज हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले. यासंदर्भात टीव्ही ९ ने वृत्त दिले आहे.

हक्काच्या घराचे सर्वसामान्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणणार – उद्धव ठाकरे

मोबाईल ॲपमुळे तरुणांना नोकरी शोधणे शक्य होईल. आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येईल. तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाईलद्वारे सहज मिळेल. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमोल मिटकरींची किमया तब्बल अडीच वर्षांनंतर गाव झालं प्रकाशमय

या ऍपचा फायदा घेण्यासाठी लॉगिन करणे गरजेचे आहे. यासाठी- 

१)वैयक्तिक माहिती( नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)

२)मोबाइल क्रमांक( आवश्यक)

३)इमेल आयडी(वैकल्पिक)

४)अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा

५)पॅन क्रमांक (वैयल्पिक, उपलब्ध असल्यास)

६)महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र( जोडणे आवश्यक)