मध्यप्रदेश आणि राजस्थान नंतर गुजरातमध्येही पद्मावती सिनेमावर बंदी

टीम महाराष्ट्र देशा – मध्यप्रदेश आणि राजस्थान नंतर गुजरातमध्ये देखील पद्मावती सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे .’पद्मावती’ चित्रपटाचा वाद पूर्णत: निकाली लागत नाही तोपर्यंत गुजरातमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केली आहे. या चित्रपटामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

सेन्सॉर बोर्डाने मंजूरी देण्याआधीच पद्मावती चित्रपटावर बंदी घालण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय मात्र राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही चित्रपटाला राजपूत समाजाकडून होणारा वाढता विरोध लक्षात घेऊन या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे