मध्यप्रदेश, ओडिशानंतर ममतांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, माध्यम क्षेत्रात उमटले पडसाद

ममता बॅनर्जीं

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर ६ मे राजी सर्व आमदारांचा शपथविधी होणार आहे. याप्रसंगी विजयी रॅली काढू नका, असं ममता बॅनर्जींनी आवाहन केले आहे.

त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील सर्व पत्रकारांना त्यांनी कोरोना योद्धा घोषित केले आहे. ‘मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते’ असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान, आज मध्य प्रदेश सरकारने देखील सर्व मान्यताप्राप्त पत्रकरांना फ्रंट लाईन वर्कर घोषित केले आहे. शिवाय कालच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील श्रमिक पत्रकारांना फ्रंटलाईन कोविड वॉरियर्स म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं आहे. तृणमूल काँग्रेसने तिसऱ्यांदा सत्ता मिळवली असून ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. भाजपानं ७७ जागांवर विजय मिळवला असून विरोधकाची भूमिका बजावणार आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डावे पक्ष आणि काँग्रेसचा एकही आमदार विधानसभेत नसणार आहे.

महत्वाच्या बातम्या