स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही कॉंग्रेसमुळे टिकून- नाना पाटेकर

पुणे – इतक्या वर्षांत कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचे श्रेय कॉंग्रेसला द्यायला हवे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मोदी सरकारवर शरसंधान साधले.नाम फाउंडेशन’तर्फे आंतरधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत नाना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले नाना पाटेकर 

इतक्या वर्षांत कॉंग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतर लोकशाही अजूनही टिकून आहे, याचे श्रेय कॉंग्रेसला द्यायला हवे.सगळ्याच पक्षात चांगले आणि वाईट लोक असतात. असे असतानाही लोकशाही आजही टिकून आहे हे कमी आहे का, असे सांगून कोण काय करते हे सगळ्यांना माहीत आहे. राजकारणी झुंजवतात आणि आम्ही झुंजतो, तेव्हा आमचे शिक्षण कुठे जात ?