बिग ब्रेकिंग : प्रदीर्घ काळानंतर प्रथमच राज ठाकरे मातोश्रीवर

मुंबई : राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर मातोश्री आणि त्यांचे नाते दुरावल्याचे दिसून आले, मात्र आता प्रदीर्घ काळानंतर राज हे प्रथमच मातोश्रीवर पोहचले आहेत. याला कारण हे अमित ठाकरे यांच्या लग्नाचे आहे. राज ठाकरे हे आपले बंधू उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेले आहेत.

राजकारणात कितीही दुरावा आला तरी रक्ताचे नाते हे शेवटी मोठे असते याचे चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मनसेच्या स्थापनेपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठे मतभेद झाले. दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांवर कडाडून टीका करताना देखील पहायला मिळाल आहे. मात्र मराठी माणसासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्यासाठी अनेक दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत. परंतु याला यश आले नाही.

अमित यांच्या लग्नाच्या निमित्ताने तरी दोन्ही बंधू एकत्र भेटत आहेत आणि तेही मातोश्रीवर. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नवीन चर्चांना  उधान आले आहे. ज्या प्रमाणे लग्नाची पत्रिका देवापुढे ठेवली जाते त्याप्रमाणे राज ठाकरे हे मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे बसत असलेल्या खुर्चीवर पत्रिका ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान. या निमित्ताने दोन्ही बंधूनी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.